बाणेर :
बाणेर पाषाण टेकडीवर गेली सोळा वर्षापासून वसुंधरा अभियान संस्थेने अविरत पणे केलेल्या हरित कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेत ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ राज्यस्तरीय -पुणे विभागातून, तृतीय क्रमांकाचे 50 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे.







पूर्णपणे ओसाड असलेल्या तुकाई टेकडी वर ४३०००+ झाडांमुळे, जंगल फुलवण्यासाठी केलेल्या तपश्चर्याचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला आहे. आज पर्यंत वसुंधरा अभियानाने केलेल्या हरित कार्याचा अनेक सामाजिक घटकांनी सन्मान केला आहे.
बाणेर – पाषाण, बालेवाडी, परिसरातील असंख्य नागरीक लहान मुले मोठया उत्साहात टेकडीवर येऊन वृक्षारोपण करत असतात. पारितोषिक जाहीर झाल्याने वसुंधरा अभियानाच्या सर्व सभासदांनी आनंद व्यक्त केला. यापुढे देखील आणखी जोमाने हरितकार्याचे हे काम करत राहू अशा भावना व्यक्त केल्या.








