बालेवाडी येथील डॉ. सागर बालवडकर यांना रॉयल एनफिल्ड च्या राइड्स आणि कम्युनिटी पश्र्चिम विभागात मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस..

0
slider_4552

गोवा :

गोवा येथे झालेल्या रॉयल एनफिल्ड डीलर कॉन्फरन्स 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतातील एक हजार आणि अधिक डीलर्स मधून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार प्रादेशिक विभागापैकी पश्चिम विभागातून रॉयल एनफिल्ड डीलर्स किंग रॉयल रायडर्स चे बालेवाडी येथील डॉ. सागर बालवडकर यांना राइड्स आणि कम्युनिटी मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.

त्यांना सीओ रॉयल एनफिल्ड बी गोविंद राजा आणि सी सी ओ रॉयल एनफिल्ड युजवेंदर सिंग यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.

व्यवसाय, शेक्षणिक आणि राजकारण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या किंग रॉयल रायडर्स चे  डॉ. सागर बालवडकर यांनी प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, किंग रॉयल रायडर्स ने नामांकित रॉयल एनफिल्ड बुलेट कंपनी मध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. योग्य नियोजन द्वारे नेहमीच सर्व बाबतीत सर्वांच्या पसंतीस उतरण्याचे काम केले असुन त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने हा प्रथम क्रमांक पटकावला आहे.

See also  शाहीर अण्णा भाऊ साठे १०१ वी जयंती बालेवाडीत उत्साहात साजरी...