बालेवाडी :
दिल्ली येथे श्रध्दा ची निर्घृण हत्या तिचा प्रियकर आफताब ह्याने केली आणि तिचे तुकडे करून शहराचा वेगवेगळ्या भागात फेकण्यात आले. अशी दुर्दैवी घटना आपल्या परिसरात ही होउ शकते. अशा घटना पुन्हा होऊ नये ह्यासाठी शुक्रवार दि 18/11/22 रोजी सायंकाळी 7.30 वाजता शांतता पूर्ण निषेध मानवी साखळी करून बालेवाडी हाईस्ट्रीट, बालेवाडी पोलिस चौकी जवळ निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी महिला सुरक्षितता बद्दल जागरूकता, लव्ह जिहाद विरोधी घोषणा व फलक दाखवून बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, सुस, महाळूंगे येथील साधरण 400 पुरुष व 200 महिला सहभागी होवून निषेध नोंदविला. अशा घटना पुनः पुनः होऊ नये म्हणून जागरूकता निर्माण व्हावी म्हणून या आक्रोश निषेध मोर्चा चे आयोजन नागरिकांनी केले होते. यावेळी मराठी सीरियल कलाकार राधिका देशपांडे यांनी लव जिहाद समस्या, व्याप्ती आणि उपाय यावर संबोधन केले.
यावेळी परिसरातील नागरिकांच्या सोबत राजकिय सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून निषेध मोर्चा मध्ये सक्रिय सहभाग घेतला. यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, ओबीसी मोर्चा राज्याचे उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, लहू बालवडकर, राहुल कोकाटे, सचिन दळवी, शिवम सुतार, अनिकेत मुरकुटे, गणेश कलापुरे, सचिन वाडेकर, सुप्रीम चोंधे, डॉ. राजेश देशपांडे, सारंग वाबळे, विकास कामत, राजेन्द्र सुतार, शिवम बालवडकर, उज्वला साबळे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत नागरिकांनी सहभाग घेत निषेध नोंदविला.