मॉडर्न महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या फ्युचर बँकर्स फोरमचा मॉक बॅंकिंग कार्यक्रम संपन्न..

0
slider_4552

गणेशखिंड :

गणेशखिंड ,येथिल मॉडर्न महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या फ्युचर बँकर्स फोरम(FBF) ने नुकताच मॉक बॅंकिंग हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. सदानंद दीक्षित, सी ई ऒ, पुणे पिपल्स कोआँपरेटिव्ह बँक आणि श्री जयंत जोगळेकर ,कन्सलटंट, विराज कॅटल फुड यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय खरात म्हणाले की, ७० टक्के बँकिंग हे इंटरनेट वर आहे. म्हणून प्रत्येकासाठी बँक कसे कार्य करते हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, व ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी हा आमच्या मॉक बॅंक चा उद्देश आहे.

प्रा.विजयालक्ष्मी कुलकर्णी म्हणाल्या,”मॉक बँकिंग ही आधुनिक बँकेचे प्रतिनिधित्व करणारी एक छोटी प्रतिकृती आहे जी स्वतः सोबत सर्वांना आधुनिक बनवते. ग्राहकांसाठी जागरूकता आवश्यक आहे.”

श्री.जयंत जोगळेकर यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मॉडेल्स आणि पोस्टर्सबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री सदानंद दीक्षितांनी मुलांना मार्गदर्शन करताना काही महत्वाच्या सुचना देत ते म्हणाले, “सर्व प्रकारच्या कामात लोकांचे मूल्यांकन करणे महत्वाचे आहे, डिजिटल फसवणुकीच्या युगात लोकांनी आता सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे” पुढच्यास ठेच मागच्यास शहाणपण असे म्हणत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या अनुभवाच्या शिदोरीतुन मुलांना काही अनुभव सांगितले. एटीएम मशीन, सीडीएम मशीन, वरिष्ठ नागरिक सिंगल विंडो , आरटीजीएस, एनईएफटी, पासबुक प्रिंटिंग मशीन, कॅश काउंटर आणि व्यवस्थापकांच्या डेस्कवरील विद्यार्थ्यांनी बँकेच्या कामकाजा विषयी आणि तिच्या सुविधांविषयी माहिती सांगत काही मॉडेल्स आणि पोस्टर्सचे सादरीकरण केले.

या प्रसंगी काही विद्यार्थ्यांचे त्यांनी पुर्वी केलेल्या कामगिरी बद्दल कोडकौतुक करुन, प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्रदान करुन त्याना शाबासकी देण्यात आली, अशा यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत
कु. आरुषा करंजेकर (FBF प्राईड 21-22)
सौरभ कुलकर्णी (विशेष कौतुक)
गुंतवणूक कनेक्ट आणि बँक आणि विमा कनेक्ट ह्या बँक ऑफ महाराष्ट्रने घेतलेल्या कार्यक्रमात सहभागी मुलांचेही कोडकौतुक झाले.
प्राजक्ता सुतार, मानसी सिंग, मेनन चंद्रिका, ऋषी रंजन, आकाश तेलंगे, श्रद्धा कुलकर्णी, रुतुजा राऊत, सागर गोमे, अरुण आगरी, केतन रेणुसे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
मॉर्डन महाविद्यालय दर वर्षी प्रत्येक विभागाच्या मुलांना तांत्रिक ज्ञान मिळावे म्हणून इंटर्नशिप ची व्यवस्था करतात, गतवर्षी (21-22)विद्या सहकारी बँकेत इंटर्नशिप च्या कालावधीत सर्वोत्तम असा शेरा मिळवणार्या योगिता मोहिते आणि लिबेरथ या दोन विद्यार्थीनींचेही कौतुक करण्यात आले.

See also  सुखाई प्रतिष्ठान व युवाशक्ती संचालित मोफत अभ्यासिका वर्गाच्या उन्हाळी सुट्टीतील विशेष वर्गाचा शेवट शैक्षणिक सहलीने.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्थानिक भागात दिवाळीच्या सुट्टीत बॅंक मित्र ही भुमिका बजाऊन असंघटीत क्षेञातील बँक ग्राहकांच्या समस्या समजाऊन घेतल्या. प्रधानमंञीवजनसुरक्षे अंतर्गत असणार्या विविध योजनांविषयी जनजागृती केली. यात उत्कृष्ठ कामगीरी केल्याबद्दल मैथिली सुर्वे FY A, दिक्षांत रणपिसे FY B, घाडसिंग FY C, श्रेयस गावडे SY, रुतुजा पुदाले TY यांना सन्मानित करण्यात आले.

पोस्टर आणि मॉडेल स्पर्धेचे ही निकाल याच प्रसंगी सांगितले, पोस्टर सादरीकरणात प्रथम क्रमांक आरटीजीएस ग्रुपकडे गेले आणि मॉडेलचे प्रतिनिधित्वात प्रथम क्रमांक एटीएम मशीन आणि सीडीएस मशीननी पटकावला

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा डाॅ पल्लवी निखारे यांनी केले. या कार्यक्रमास कला शाखेच्या उपप्राचार्या डाॅ ज्योती गगनग्रास उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन फ्युचर बँकिंगच्या संस्थपिका वाणिज्य विभागातील प्रा. विजयालक्ष्मी कुलकर्णी मॅडम यांनी केले.डाॅ शुभांगी जोशी ,उपप्राचार्य वाणिज्य विभाग यांनी उपक्रमाचे कौतुक केले. डाॅ प्रकाश दिक्षित उपकार्यवाह, पी ई सोसायटी व प्रा सुरेश तोडकर सहकार्यवाह, पी ई सोसायटी यांनी ही अभिनंदन केले. संपूर्ण कार्यक्रम प्राचार्य डाॅ संजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.