सौदी अरेबियाने केला मेस्सीच्या बलाढय अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव..

0
slider_4552

कतार :

फ़ुटबाँल वर्ल्ड कपच्या तिसऱ्या दिवशी मोठा उलटफेर झाला. क गटात सौदी अरेबियाने बलाढ्य अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव केला. कर्णधार लिओनेल मेस्सीच्या गोलनंतरही अर्जेंटिनाचा संघ हा सामना जिंकू शकला नाही.

अर्जेंटिनाचा संघ शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिला, मात्र त्यांना स्कोअरची बरोबरी करता आली नाही.

सामना सुरु होऊन 10 मिनिटे होताच अर्जेटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने पहिला गोल करत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर . सौदी अरेबियाकडून सालेह अलसेहरीने ४८व्या मिनिटाला आणि सालेम अल्दवसारीने ५३व्या मिनिटाला गोल केले. 90 मिनिटांचा खेळ संपेपर्यंत सौदी अरेबियाने 2-1 अशी आघाडी कायम ठेवली होती. यानंतर दोन्ही संघांना 14 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. या अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र सौदीचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही.

दरम्यान, या पराभवासह अर्जेंटिनाची सलग 36 सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. अर्जेंटिनाचा पुढील सामना आता 27 नोव्हेंबरला मेक्सिको आणि 30 डिसेंबरला पोलंडशी होणार आहे. अर्जेंटिनाला आता प्री-क्वार्टर फायनलसाठी आपले उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील.

See also  प्रो कबड्डी स्पर्धेत दिवसातील तिन्ही सामने टाय