नवी दिल्ली :
IPL 2023 साठी या महिन्यात मिनी लिलाव होणार आहे. प्रत्येक संघाने आपली आपली तयारी सुरु केली आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बीसीसीसीआय आता महिला आयपीएल करण्याची तयारी करत आहे.
आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार पुढील वर्षांपासून महिला आयपीएल सुरु होणार आहे आणि या पहिल्या हंगामात पाच संघ सहभागी होणार आहे. फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी 400 कोटींची मूळ किंमत ठेवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
स्पर्धेत 20 साखळी सामने होऊ शकतात
या स्पर्धेत 20 लीग खेळांचा समावेश असेल, ज्यामध्ये संघ दोनदा एकमेकांशी खेळतील. टेबल टॉपर्सना थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल, तर दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आलेले संघ एलिमिनेटरमध्ये भाग घेतील. अशा प्रकारे या स्पर्धेत एकूण 22 सामने होण्याची तयारी सुरू आहे. प्रत्येक संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त पाच परदेशी क्रिकेटर असू शकतात.
1500 कोटी मिळण्याची अपेक्षा आहे
बीसीसीआयला फ्रँचायझीकडून एक हजार ते 1500 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. म्हणजेच 5 फ्रँचायझींकडून बोर्डाला 6 ते 8 हजार कोटी रुपये मिळू शकतात.
बीसीसीआयने सर्व राज्य संघटनांना एक नोट पाठवली आहे
त्यात असे लिहिले आहे की, ‘देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समतोल साधण्यासाठी आणि स्पर्धात्मक संघ असण्यासाठी WIPL साठी पाच संघ तात्पुरते ठरवले गेले आहेत. प्रत्येक संघात जास्तीत जास्त अठरा खेळाडू असू शकतात, जेथे कोणत्याही संघात सहा पेक्षा जास्त परदेशी खेळाडू असू शकत नाहीत.