slider_4552

नागपूर :

गेली तीन वर्षे मेगा भरती रखडली आहे. अनेकदा जम्बो भरतीची घोषणा करण्यात आली पण काही ना काही कारणास्तव ही भरती रखडल्याचं दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी १२ हजारांपेक्षा जास्त पोलीस दलातील भरतीची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजाने या भरती प्रक्रियेस तीव्र विरोध केला होता. जो पर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या भरतीस स्थगिती द्यावी अन्यथा मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात यावी अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात अली होती. मराठा समाजातील युवकांसाठी जागा राखीव ठेवण्याच्या पर्यायाची देखील सरकारतर्फे चाचपणी करण्यात आली होती.

यावेळी पोलीस दलातील १२ हजार ५३८ विविध पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. यात पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० जागांसाठी भरती होणार आहे तर उर्वरित जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती होणार आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसंच, १२ हजार ५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी ५ हजार पदे भरण्याबाबत विचार करण्यात येईल, असा विश्वासही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात पोलिसांची संख्या कमी आहे. त्यातच करोनामुळे पोलिसांवर कामाचा अधिकचा ताण आला आहे. शिवाय अनेक पोलिसांना करोनाची लागण झाली असून अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे सुद्धा पोलीस भरती करण्यात येत असल्याचं बोललं जातं आहे.

 

 

See also  दादरमधील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर कायमस्वरुपी विद्युत रोषणाई