पाषाण येथे अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) जनजागृती मोहीम !

0
slider_4552

पाषाण :

रविवार दि. १० जानेवारी रोजी पाषाण, सुसरोड येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात राहुल कोकाटे मित्र परिवार व सहकार विभाग आणि पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघातर्फे आयोजित मानीव अभिहस्तांतरण मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पाषाण येथील सोसायटी आणि अपार्टमेंट्स साठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, स्नेहा जोशी, ॲड. कणाद लहाने, ॲड. नीता साळुंके, महासंघातर्फे सुहास पटवर्धन, देवराज लिगाडे, प्रिती शिरोडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

अधिकारीवर्गाचा मार्गदर्शनानानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. ह्या कार्यक्रमात 60 सोसायटीतील प्रतिनिधीनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रमास राहुल कोकाटे, भगवान निम्हण यांचे विशेष सहकार्य लाभले.

अनेक सोसायट्यांमधील नागरिकांच्या अभिहस्तांतरण समस्या होत्या, या समस्या सोडविण्यासाठी व मार्गदर्शनासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी महिती राहुल कोकाटे यांनी दिली.

 

See also  निरंकारी बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाषाण बाणेर लिंक रोड या ठिकाणी वृक्षारोपण व स्वच्छता अभियान !