बालेवाडीच्या चेतक स्पोर्ट्स क्लब ने पटकाविले पुणे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद तर प्रकाश तात्या बालवडकर फाऊंडेशन ला उपविजेतेपद…महिला गटात राजमाता जिजाऊ विजयी

0
slider_4552

पुणे :

पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरूष विभागात बालेवाडी गावाच्या चेतक स्पोर्ट्स क्लब ने विजेतेपद पटकाविले तर बालेवाडी गावाच्याच प्रकाश तात्या बालवडकर फाऊंडेशन संघाने उपविजेतेपद पटकावले. तर महिला गटात राजमाता जिजाऊ संघाने एमडी स्पोर्ट्स क्लब चा पराभव करून विजेतेपद पटकाविले. एकाच गावातील दोन संघांनी अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा योगायोग या स्पर्धेत पाहायला मिळाला.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रकाश तात्या बालवडकर संघाने भैरवनाथ संघ भोसरी संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या सेमी फायनल मध्ये चेतक स्पोर्ट्स क्लब बालेवाडी संघाने श्रीकृष्ण संघ बाणेर संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

चेतक स्पोर्टस् क्लब बालेवाडी 36 गुण विजयी विरूध्द प्रकाशतात्या बालवडकर फाऊंडेशन 17 गुण असा 19 गुणांनी चेतक स्पोर्ट्स क्लब बालेवाडी विजयी झाला. चेतक स्पोर्ट्स क्लब संघाकडून उत्कृष्ट पकडी बालाजी जाधव, राहुल वाघमारे, स्वप्निल बालवडकर, उक्रुष्ट चढाई समीर ढोकळे, आशिष पाडाळे यांनी चांगला खेळ केला तर पराभूत संघाकडून मयूर शिरवे व शुभम पाटील आणि बबलू गिरी यांचे प्रयत्न अपुरे पडले. चेतक स्पोर्ट्स क्लब विजयात संघाचे प्रशिक्षक गणेश बालवडकर आणि इतर सहकारी माजी खेळाडू यांची भूमिका महत्वाची ठरली. संघावर घेतलेले परिश्रम कामी आले.

या स्पर्धेतून पुणे जिल्ह्याचा पुरूष आणि महिला विभागात पुणे जिल्ह्याचा संघ निवडला जाईल.

See also  नॅशनल केमिकल लॅबराॅटरी (एन सी एल) पाषाण रोड येथे लॅब ला आग