पुणे बार असोसिएशन तर्फे ‘लॉ ऑफ प्रेसिडेंट अँड ट्रायल कोर्ट प्रॅक्टिस: ज्युडीशीयल डिस्कोर्स’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन…

0
slider_4552

शिवाजीनगर :

पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशन तर्फे वकीलांसाठी अशोका हॉल येथे सोमवार दिनांक १७/१२/२०२२ रोजी दुपारी २.०० वा. उच्च व सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ व लेखक ऍड. राजेंद्र अनभुले सर यांचे “लॉ ऑफ प्रेसिडेंट अँड ट्रायल कोर्ट प्रॅक्टिस: ज्युडीशीयल डिस्कोर्स” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंगजी थोरवे हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माननीय व्याख्याते ऍड. अनभुले सर म्हणाले की, देशातील लोकशाहीच्या बळकटी साठी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ या तीनही घटकाने प्रभावीपणे कार्य करणे गरजेचे आहे.  पक्षकाराच्या हितासाठी सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. वकीलांनी त्यांच्या प्रकरणात सायटेशन दाखल करताना त्यातला नेमका कोणता भाग दाखल करावा हे समजले पाहिजे त्यासाठी संपूर्ण सायटेशन हे अभ्यासले पाहिजे. तसेच नवोदित वकीलांनी कष्ट करण्याची तयारी दाखविली पाहिजे व धैर्यशील राहून प्रामाणिकपणे वकिली केली पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ऍड. अनभुले सर यांनी भारतातील अनेक महत्वपूर्ण खटल्यांचे अवलोकन करत उपस्थितांना त्यातील कायद्याच्या बाजू समजावून सांगितल्या. तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून वकील वर्गांच्या शंकांचे निरसन केले.

याप्रसंगी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले की, अनभुले सरांचा कायद्यावर गाढा अभ्यास असून अनेक कायद्याच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. अध्यापनाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत. वकिलांच्या उन्नतीसाठी आहे सदैव ते प्रयत्नशील असतात. तसेचे नेहमीच पुणे बार असोसिएशनला मा. अनभुले सरांचे मार्गदर्शन लाभले आहे. याचप्रकारे त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग वकील बांधवाना व्हावा या हेतूने सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे  प्रास्ताविक पुणे बार असोसिएशन चे
अध्यक्ष ऍड. पांडुरंगजी थोरवे यांनी केले.
तसेच सूत्रसंचालन पुणे बार असोसिएशन च्या सचिव , ऍड. सुरेखा भोसले यांनी केले. तर आभार ऍड. सई देशमुख यांनी मानले.

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा संपन्न

सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष- ऍड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष- ऍड. लक्ष्मण येळे पाटील, सचिव ऍड. अमोल शितोळे, खजिनदार ऍड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस ऍड. शिल्पा कदम व कार्यकारिणी सदस्य –  ऍड. काजल कवडे, ॲड. सई देशमुख, ऍड. अजय नवले, ऍड. तेजस दंडागव्हाळ तसेच जेष्ठ विधीज्ञ व मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते.