हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा…

0
slider_4552

नवी दिल्ली :

हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघाची शुक्रवारी (23 डिसेंबर) घोषणा करण्यात आली. 18 सदस्यीय संघाचे कर्णधारपद बचावपटू हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे. हरमनप्रीत मनप्रीत सिंगच्या जागी संघाची धुरा सांभाळणार आहे. 13 जानेवारीपासून ओडिशामध्ये हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. अंतिम सामना २९ जानेवारीला होणार आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आणि राउरकेला येथे हे सामने होणार आहेत.

बचावपटू अमित रोहिदासला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. हरमनप्रीतने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघाची धुरा सांभाळली होती. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 1-4 असा पराभव झाला. मिडफिल्डर मनप्रीत सिंगने टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर टीम इंडियाने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले.

भारताचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड संघातील वेगवेगळ्या खेळाडूंना कर्णधारपद देण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे वरिष्ठ खेळाडू अधिक जबाबदार ठरतात, असे त्याचे मत आहे. अमित रोहिदासनेही संघाचे नेतृत्व केले आहे.

बेंगळुरू येथील SAI केंद्रात दोन दिवसांच्या चाचणीनंतर विश्वचषक संघाची निवड करण्यात आली. 33 खेळाडूंनी चाचण्यांमध्ये भाग घेतला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेले गुरजंत सिंग आणि दिलप्रीत सिंग हे मुख्य संघाचा भाग नसून दोघेही स्टँडबाय म्हणून विश्वचषक संघासोबत असतील.

भारताचे वेळापत्रक

विश्वचषक भारतीय संघ राउरकेला येथील नव्याने बांधलेल्या बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध पहिला सामना खेळेल. टीम इंडिया या मैदानावर पूल-डीमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे. यानंतर ती भुवनेश्वरमध्ये वेल्सविरुद्ध तिसरा सामना खेळणार आहे. 22 जानेवारीपासून बाद फेरीचे सामने सुरू होतील. 22 आणि 23 जानेवारीला क्रॉसओव्हर सामने खेळवले जातील. उपांत्यपूर्व फेरी 25 जानेवारीला तर उपांत्य फेरी 27 जानेवारीला होणार आहे. 29 जानेवारीला अंतिम आणि कांस्यपदकाचा सामना होणार आहे.

हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघाचे

गोलरक्षक : कृष्ण बहादूर पाठक आणि पीआर श्रीजेश.

बचावपटू : जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप. मिडफिल्डर : मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकंता शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग.

See also  चेन्नई सुपर किंग्सने २७ धावांनी विजय मिळवत चौथ्यांचा आयपीएल चषकावर कोरले नाव.

फॉरवर्ड: मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक आणि सुखजित सिंग.

बदली खेळाडू: राजकुमार पाल आणि जुगराज सिंग.