विद्यार्थांनी घेतले नविन वर्षासाठी आजी आजोबांचे अर्शिवाद.

0
slider_4552

तळेगाव :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यामधे विविध कौशल्ये क्षमता विकसित व्हायला हव्यात व त्याची रोजगार क्षमता वाढावी यासाठी फ्युचर्स बँकर्सच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. मुल्यशिक्षण व सामाजिक बांधिलकीसाठी दरवर्षी ३० डिसेंबर रोजी नविन वर्ष आजी अजोबांबरोबर साजरे केले जाते. या वर्षी तळेगाव दाभाडे येथे वानप्रस्थाश्रम या वृध्दाश्रमाला भेट दिली गेली.

महाविद्यालयाच्या जाणिव या सामाजिक उपक्रमाबरोबर फ्युचर्स बॅकर्स फोरमने आजी अजोबा व युवा पिढी यांच्यातील नाते वृद्धिंगत करत नविन वर्षाचे स्वागत केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आजी आजोबांच्या बँकिंग विषयक समस्या जाणून घेऊन डिजिटल बँकिंग सुविधा व सुरक्षा याबद्दल चर्चा केली.

या प्रसंगी सुरेश साखवळकर व उर्मिला छाजेड यांनी विद्यार्थ्यां बरोबर संवाद साधला व भारतीय सामाजिक संस्कृती जपण्यासाठी महाविद्यालयाने आयोजत केलेल्या या उपक्रमांचे कौतुक केले.

आजी आजोबांनी आपल्या भावना व्यक्त करुन युवकांना मार्गदर्शन केले. महाविद्यातर्फे यावेळी वृध्दाश्रमाला साखर व मिठाई याची भेट दिली.

यावेळी १५ विद्यार्थी व ४ प्राध्यापकांनी सहभाग लाभला. हा संपूर्ण कार्यक्रम प्रा विजयालक्ष्मी कुलकर्णी व डाॅ मंजुषा कुलकर्णी यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला डाॅ गौरी कोपार्डेकर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला उपप्राचार्यांनी पाठिंबा दिला. संपूर्ण कार्यकमाला प्राचार्य डाॅ संजय खरात यांचे मार्गदर्शन केले. प्रा सुरेश तोडकर सहकार्यवाह पी ई सोसायटी व डाॅ प्रकाश दिक्षीत उपकार्यवाह पी ई सोसायटी यांनी शुभेच्छा दिल्या.

See also  "ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया" पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न