राष्ट्रीय जलतरण पट्टू गीताचा उपचार आणि करीयरसाठीचा संपूर्ण खर्च याची जबाबदारी घेणार : चंद्रकांत पाटील

0
slider_4552

कोथरूड :

1 जानेवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्हाचे पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी एका स्पर्धेदरम्यान जेली फिश चा दंश झालेल्या राष्ट्रीय जलतरण पटू गीताला भेटण्यासाठी घरी आले होते. दादांनी अतिशय आत्मियतेने गीताची चौकशी करुन उपचार व पुढील उपचार यासंबंधी माहिती घेतली.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सेकंड ओपिनियन साठी मुंबई येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये फोनही केला. आणि तिकडे जाण्याचा किंवा पुण्यात पुना हॉस्पिटल मधील पुढील ट्रिटमेंटचा तसेच फिजिओथेरपीचा सर्व खर्च स्वतः करणार असल्याची हमी दिली तसेच इथुन पुढील तीच्या करीयर साठी लागणारा खर्च करणार असल्याचे दादांनी सांगितले.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आसलेले दादा खरोखरच आपल्या कुटुंबातील पालकांप्रमाणेच आंम्हाला बळ आणि विश्वास देऊन गेले. नव वर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात खुप भारावून टाकणारी चैतन्यमय झाली. आणि 2022 मधील नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ज्या काही वाईट मानसिक, भावनिक परीस्थितीतुन संपुर्ण परिवार गेला होता त्यातुन बाहेर पडुन नवीन उर्जा निर्माण झाली. असे यावेळी गीताने सांगितले.

गीताच्या हातावर उपचार करणारे कर्तव्यदक्ष डॉक्टर अमोघ पाठक हेही यावेळी उपस्थित होते त्यांनी चंद्रकांतदादांना संपूर्ण उपचारासंर्भात माहिती दिली.

कर्वेनगर भागातील कार्यसम्राट नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी गीताला भेट दिल्यानंतर त्यांनीच सांगितले होते. गीताची परिस्थिती मी उपमुख्यमंत्री देवंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या कानावर घालतो. ते नक्की मदत करतील आणि चार दिवसातच राजाभाऊ बराटे आणि विठ्ठल आण्णा बराटे या दोघांनीही पालकमंत्र्यांनाच प्रत्यक्ष भेटीला घेऊन आले. आणि पालकमंत्र्यांनी पुढील उपचार आणि करीयरसाठीचा संपूर्ण खर्च याची जबाबदारी याचे आश्वासन दिले.

नगरसेवक राजाभाऊ बराटे, कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष पुनित जोशी, लोकप्रिय कार्यकर्ते विठ्ठलआण्णा बराटे, नगरसेवक सुशीलभाऊ मेंगडे, नगरसेवक संदीपजी खर्डेकर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अमोघ पाठक यांचा सन्मान चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अनिल पवार यांनी आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानने पुर्नप्रकाशित केलेले “मुळशी सत्याग्रह” हे पुस्तक दादांना भेट म्हणुन दिले.

See also  सुस ग्रामपंचायत उपसरपंच पदी दिशा अनिल ससार यांची बिनविरोध निवड!