गणेशखिंड :
गणेशखिंड येथील पी ई सोसायटीच्या माॅडर्न महाविद्यालयाला नॅशनल अँक्रिडेशन व असेसमेंट कमिटिने दिलेल्या अहवाआनुसार A+ (With CGPA 3.41) ग्रेड जाहिर करण्यात आली.
२६ व २७ डिसेंबर रोजी आलेल्या पीअर टिमने महाविद्यालयातील शैक्षणिक, संशोधन, पर्यावरण, सांस्कृतिक व इतर बाबींचा आढावा घेतला. दोन दिवसाच्या भेटीत त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. महाविद्यालयातील संशोधन, पर्यावरण, सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
महाविद्यालयाची स्वतःची खास बलस्थाने आहेत. महाविद्यालयाला भारत सरकारच्या बायोटेक डिपार्टमेंटने दिलेले स्टार डिबीटी स्टेटस् आहे. महाराष्ट्रातील ३ महाविद्यालयापैकी बिल्डर हे स्टेटस असलेले सावित्रीबाई फुले पुणे महाविद्यालयातील एकमेव महाविद्यालय आहे. महाविद्यालयाला वेगवेगळ्या सरकारी व खाजगी संस्थाच्या संशोधन ग्रँट आहेत.
महाविद्यायला महाराष्ट्र सरकारचा एनर्जी कझर्वेशनचा ‘मेढा’ पुरस्कार आहे. पवन व सौर विद्युत ऊर्जेचा प्रकल्प असणारे हे पहिले महाविद्याल आहे. महाविद्यालयाला वसुंधरा फाउंडेशनचे पुरस्कार आहेत. महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधे सामाजिक जाणिव तयार व्हावी यासाठी उपक्रम आहेत .
महाविद्यालयामार्फत रजिस्टर्ड माजी विद्यार्थ्यांची “माॅडर्नाईटस्” ही संघटना आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असुन ते आजी विद्यार्थ्यांना संपूर्ण मदत करतात. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांना स्वतःच्या व्यवसायात सामाऊन घेणे अशा वेगवेगळ्या प्रकारांनी ते महाविद्यालयाशी संबंधित आहेत.
महाविद्यालयाचा मागची ग्रेड ३.२६. (A) ते आत्ताची ३.४१(A+) ग्रेड हा प्रवास खुप प्रेरणादायी आहे. महाविद्यालयाला हे यश प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा डाॅ गजानन एकबोटे यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले आहे. संस्थेचा सतत चांगल्या उपक्रमांना पाठिंबा असतो म्हणून हे शक्य झाले आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी हे अहोरात्र कष्ट घेतले आहेत त्याचे हे फळ आहे अशी भावना प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी व्यक्त केली.