बावधन :
बावधन येथील अथर्व ब्लीस सोसायटी येथे पतंगाच्या मांजा मध्ये अडकून घार जखमी झाली होती. हे झाल्याचे समजल्याने लागलीच त्या ठिकाणी दिपक दगडे पाटील यांनी उपस्थित राहून सहकारी पक्षीमित्र यांना घटनास्थळी बोलावून घेऊन सदर घारीच्या पंखा मध्ये अडकलेला मांजा काढून घेतला. आणि पक्षाला जीवदान देण्याचे मौल्यवान काम केले.




याबद्दल माहिती देताना माजी उपसरपंच दिपक दगडे पाटील यांनी सांगितले की, अथर्व ब्लीस सोसायटी येथे पतंगाच्या मांजा मध्ये अडकून घार जखमी झाली होती सहकरी पक्षी मित्र बोलावून अडकलेला मांजा काढून घारी ला पाणी पाजून ती व्यवस्थित असल्याची खात्री केली. घार बरी असल्याचे पाहून सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर पाणी पाजवून तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे सोडून देण्यात आले.
पुढे दिपक दगडे पाटील म्हणाले की, सध्या मकरसंक्रांत जवळ आल्याने सर्वच युवा आणि बाल चमू पतंग उडवण्याच्या उत्साहात आहेत. परंतु आपले सण साजरे करताना एखाद्या पक्षी आणि प्राण्याला आपल्यामुळे काही इजा किंवा हानी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेतली तर नक्कीच असे प्रसंग परत होणार नाहीत. त्यामूळे आपला पतंग उढविण्याचा आनंद एखाद्या प्राणी मात्राच्या जीवावर बेतू शकतो म्हणून सर्वांनी खबरदारी घ्यावी अशी सर्वांना विनंती आहे.








