शिवाजीनगर :
पी.ई.एस मॉडर्न गर्ल्स हायस्कूल, शिवाजीनगर, पुणे ५ या प्रशालेमध्ये गुरुवारः दि. १२/०१/२०२३ रोजी ३३ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२३ कार्यक्रमाच्या अनुषंगाने R.S.P. पथकाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनीनी बालगंधर्व जवळील झाशी राणी चौकात वाहतुकीच्या नियमांची जागृती केली. या उपक्रमात इ. ८ वी क व ९ वी क च्या ४० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थिनीनी पथनाट्य सादर केले. सिग्नलवरील रंगित दिव्यांचे अर्थ समजावून सांगितले व ज्यांनी हेल्मेट घातले होते त्यांना गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले.
या अभियानासाठी पोलिस उपनिरीक्षक वसंत देसाई सर, म.पो.शि. देविदास पाटील सर व म.पो.शि. अश्विनी सरप मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.सौ. माया नाईक मॅडम कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थिनीना प्रोत्साहित केले. प्रशालेतील शिक्षिका सौ. योगिता जोशी व सौ. आशा दाते यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा.डॉ गजानन एकबोटे सर व सहकार्यवाह मा.डॉ.सौ. ज्योत्स्ना एकबोटे मॅडम यांनी उपक्रमाचे कौतुक केले.