हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताची स्पेन वर 2 – 0 अशी मात

0
slider_4552

राउरकेला :

इंडियाने शुक्रवारी राउरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर स्पेनविरुद्ध त्यांच्या विश्वचषक मोहिमेची जोरदार सुरुवात केली. भारताने पहिल्याच सामन्यात स्पेनचा 2-0 असा पराभव केला.

भारतीय खेळाडूंनी मैदानावर चमकदार कामगिरी करत स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. अखेर टीम इंडियाने पहिला सामना जिंकून विजयी सुरुवात केली. भारताला स्पेन, इंग्लंड आणि वेल्ससह पूल डी मध्ये स्थान देण्यात आले आहे.

भारताने 13व्या मिनिटाला केला पहिला गोल

पहिल्या क्वार्टरमध्ये स्पेनचे वर्चस्व होते पण भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशने एकही गोल होऊ दिला नाही. श्रीजेशने शानदार सेव्ह करत टीम इंडियाला पुढे नेले. टीम इंडियाला 11व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पेनल्टी कॉर्नर हरमनप्रीतला गोल करता आले नाही. यानंतर 13व्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा अमित रोहिदासने पुरेपूर फायदा घेतला. अमितने शानदार ड्रॅग फ्लिकसह भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

https://twitter.com/TheHockeyIndia/status/1613918875577614338?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1613918875577614338%7Ctwgr%5E2921bc6ffaa80e776acbbfb6e3483a664875d00d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  शुटिंग वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या राही सरनोबतने पटकावलं सुवर्णपदक !