हॉकी विश्वचषकात वेल्स ला पराभूत करून देखील भारत गटात दुसरा, उपांत्य फेरीत जाण्यासाठी खेळावा लागणार न्यूझीलंडविरुद्ध क्रॉस ओव्हर सामना…

0
slider_4552

ओरीसा :

ओरीसा येथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकात गुरुवारी (19 जानेवारी) भारत विरुद्ध वेल्स असा सामना झाला. थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल होण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात 8 गोलाच्या फरकाने सामना जिंकणे गरजेचे होते.

मात्र, वेल्सने अखेरच्या सामन्यात आपला खेळ उंचावत भारताला कडवी झुंज दिली. भारताने 4-2 असा विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले.

भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात भारत मोठ्या विजयाच्या अपेक्षेने मैदानात उतरला. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात विजय तर दुसऱ्या सामन्यात बरोबरी साधली होती. दुसरीकडे, वेल्सने दोन्ही सामने गमावल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलेले. भारताला या सामन्यातून थेट उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी 8 गोलाच्या फरकाने विजय मिळवणे अनिवार्य होते.

वेल्सने या सामन्यात भारताला झुंज देत पहिल्या क्वार्टर मध्ये एकही गोल करू दिला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 22 व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल करत खाते उघडले. मात्र, तरीही भारताला आक्रमकतेने खेळ करता आला नाही. तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला आकाश टिपणे गोल करत आघाडी वाढवली. मात्र, त्या क्वार्टरच्या अखेरीस वेल्सने दोन गोल करत सामना बरोबरीत आणला. शेवटचा क्वार्टरमध्ये पुन्हा एकदा हरमनप्रीत व आकाशदीप यांनीच गोल करत 4-2 अशी आघाडी मिळवून दिली. अखेर याच फरकावर सामना भारताने जिंकला.

‌ या गटात अव्वलस्थानी राहत इंग्लंडने थेट उपांत्यपूर्व फेरी खेळण्यासाठी पात्रता मिळवली. तर भारताला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध क्रॉस ओव्हर सामना खेळावा लागेल.

 

See also  भारताचा श्रीलंकेवर ४ गडी राखत शानदार विजय, मालिकाही जिंकली..