सुस :
भैरवनाथ मंदिरामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुस मधील विद्यार्थी व पालक यांना गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी ‘सेवा सारथी फाउंडेशन’ तर्फे सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वाटप करण्यात आले.
संस्थेच्या मार्फत विविध समाज उपयोगी उपक्रम नेहमीच राबविले जातात. आपल्या पालकांनी टू व्हीलर चालविताना स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच मुलांना हेल्मेट वाटले जेणे करून मुलांनी घरी जाऊन आपल्या पालकांना हेल्मेट वापरण्यासाठी हट्ट करावा. जेणे करून गाडी चालविताना स्वतः ची काळजी घेणे म्हणजे आपल्या परिवाराची काळजी घेणे हे पालकांना पटेल व ते गाडी चालवताना हेल्मेट चा वापर करतील. या हेतूने संस्थे मार्फत विद्यार्थांना हेल्मेट वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी सुस गावातील हनुमान विविधकारी सोसायटीचे चेअरमन नामदेव चांदेरे, माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन मामा चांदेरे, मा. व्हाईस चेअरमन गोपीनाथ चांदेरे, न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गुलाब नाना चांदेरे, माजी उपसरपंच सुहास भोते, सामाजिक कार्यकर्ते शरद भोते, सुखदेव चांदेरे, अमित तोडकर, आय सी आय सी बँकेच्या शिंदे मॅडम, वंदना चांदेरे, सुषमा ताम्हाणे, लक्ष्मण फणसे, जालिंदर आप्पा चांदेरे, जिल्हा परिषद चे मुख्याध्यापक गावडे सर तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.