दुसरा वनडे सामना 8 विकेट्सने जिंकून भारताचा मालिका विजय..

0
slider_4552

रायपूर :

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा वनडे सामना रायपूर येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या विजयासह भारताने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा याने अर्धशतक झळकावले.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवत न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखले. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 34.3 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 108 धावा केल्या. हे आव्हान भारतीय संघाने 20.1 षटकात 2 विकेट्सच्या मोबदल्यात 111 धावा करत पूर्ण केले.

भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सर्वाधिक धावा केल्या. रोहितने या सामन्यात 50 चेंडूंचा सामना करताना 51 धावांये योगदान दिले. या धावा करताना रोहितने 2 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊसही पाडला. रोहितव्यतिरिक्त या सामन्यात शुबमन गिल याने नाबाद 40 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, विराट कोहली याला फक्त 11 धावांवर समाधान मानावे लागले. तसेच, ईशान किशन यानेही नाबाद 8 धावांचे योगदान दिले. मात्र, भारताने सहजरीत्या सामना खिशात घातला.

यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना दोन गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आले. त्यात हेन्री शिप्ले आणि मिचेल सँटनर यांचा समावेश होता. दोघांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 52 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. या धावा करताना त्याने 5 चौकारही पाऊस पाडला त्याच्याव्यतिरिक्त मिचेल सँटनर (27) आणि मायकल ब्रेसवेल (22) यांनीही संघाच्या धावसंख्येत खारीचा वाटा उचलला. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 10 धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार टॉम लॅथम याने फक्त 1 धाव काढली

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 6 षटके गोलंदाजी करताना 18 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनाही प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले.

See also  सचिन तेंडुलकरने वाढदिवसाच्या निमित्त केला समाजोपयोगी संकल्प