बावधन :
२६ जानेवारी २०२३ रोजी पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल बावधन येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ,,माजी नगरसेवक व केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाचे महाराष्ट्र राज्य संयोजक श्री . शामराव सातपुते, शिवसेना संपर्कप्रमुख आणि श्री अण्णाभाऊ साठे मंडळाचे सदस्य श्री बाळासाहेब भांडे , दैनिक सकाळचे श्री . कुडले सर , लोकमत चे पत्रकार श्री नगरे सर तसेच शाळेचे संस्थापक श्री बांदल सर उपस्थित होते
शाळेतील सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहात शाळेच्या प्रांगणात हजर होते. प्रमुख पाहुणे शामराव सातपुते बाळासाहेब भांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरवात झाली. राष्ट्रगीत गायन व परेड द्वारे तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. इयत्ता ६वी व ७ वी च्या विद्यार्थ्यांनी सुमधुर स्वरात देशभक्ती पर गीत सादर केले. मराठी, संस्कृत, इंग्रजी व जर्मन अशा विविध भाषांमधून विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांचे मनोगत व्यक्त केले.
इयत्ता ८वी च्या विद्यार्थिनींनी कराटे व मनोरे यांचे नयनरम्य प्रात्यक्षिक सादर करून कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या विशेष प्राविण्याबद्दल त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्व मान्यवर, शाळेचे संस्थापक व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रुचिरा खानविलकर यांनी सुद्धा भाषणाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणातून मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रसंगावधानता , सुजाण नागरीक कसे बनावे याविषयी मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांचे आभार शाळेतील विद्यार्थिनी तन्वी बालपत्की हिने मानले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी मुख्याध्यापिका रुचिरा खानवळकर यांचे मार्गदर्शन लाभले.