सुतारवाडी :
सुतारवाडी गावातील मूळ देवस्थान श्री काळ भैरवनाथ व श्री शनिदेव नूतन मंदिर उभारणी निमित्त भूमिपूजन व पायाभरणी करण्यात आली. आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन आणि पायाभरणी सोहळा संपन्न झाला. लवकरच विलोभनीय असे मंदिर उभे राहील.







सुतारवाडी ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार यांच्याशी चर्चा करत आपल्या गावातील मंदिर सुसज्ज विलोभनीय सुंदर असे असावे असे विचार व्यक्त केले. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत आबासाहेब सुतार यांनी लगेचच तत्परता दाखवत श्री काळ भैरवनाथ व श्री शनिदेव नूतन मंदिर उभारणी निमित्त भूमिपूजन व पायाभरणी सोहळा ग्रामस्थांना बरोबरीत घेत संपन्न केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार, बबन भाऊ सुतार, वाढेश्वर भगत, काळ भैरवनाथ भगत सुभाष तात्या रणपिसे, बाळासाहेब सुतार, विठल अण्णा सुतार, विश्वास सुतार, जयसिंग सुतार, सुदाम हिवरेकर, अंकुश रणपिसे, नितिन निम्हण, उद्धव गोळे, शिवम सुतार, सुदाम दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.








