बालेवाडी फाट्या जवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन..

0
slider_4552

बाणेर :

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पुण्यातील बाणेर बालेवाडी येथील बालेवाडी फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश किसन बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

या वेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश किसन बालवडकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफ आर पी, महावितरण शेतकऱ्यांचे वीज कट करू नये,, शेतकऱ्यांना दिवसा बारा तास लाईट पिक विमा कंपन्यांनी त्वरित नुकसान भरपाई द्यावी, प्रोत्साहित 50000 च्या अनुदान शेतकऱ्यांचे नावे जमा करावी, कापूस तुर, सोयाबीनला बाजार मिळावा आणि बालेवाडी बाणेर मधील कुत्रिम पाण्याचा जो तुटवडा चालू आहे तो प्रशासनाने लक्ष घालून पूर्ववत करावा अशा महत्वाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश किसन बालवडकर, कोथरूड अध्यक्ष हनुमंत बालवडकर, स्वाभिमानी वाहतूक रिक्षा संघटनेचे दिलीप बालवडकर, गोसेवक संदीप बालवडकर, रंगनाथ ताम्हाणे, महादेव कदम, उमेश सत्रे आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. जोरदार घोषणा देत फलक दाखवून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा जमा झाला होता.

See also  श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाणेर यांच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द