पुणे :
दिनांक 3/3/2023 रोजी लर्निग लिंक्स फाऊंडेशन आयोजित व मास्टर कार्ड यांच्या साह्याने”सशकती” महिला उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्र वितरणाचा समारंभ श्री संत माई स्किल devlopment सेंटर, सभागृहात पार पडला. या समांभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या की महिलांनी आपले उद्योग घरगुती ना ठेवता त्याला व्यावसायिक स्वरूप देणे गरजेचे आहे. उद्योजकता आधुनिक तंत्रज्ञानाची संगड घालावी.
यशस्वी स्किल अकॅडमी chya प्राचार्या श्रीमती स्मिता धुमाळ म्हणाल्या की उद्योजक घडवणे काळाची गरज आहे.
कु.सनम शेख राज्य व्यवस्थापक महाराष्ट्र LLF यांनीही समाधान व्यक्त केले.
2022-23 मधे लर्निग लिंक्स फाऊंडेशन ने SASHKTI कार्यक्रमा अंतरगत 3800 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.असे लर्निग लिंक्स फाउंडेशन चय श्रीमती स्वाती दुधाले यांनी सांगितले
महिला उद्योजकांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रशिक्षकनमुळे आम्ही डिजिटल मार्केटिंग,उद्योग रजिस्ट्रेशन, बिझनेस प्लॅन कसे बनवायचे हे शिकलो.
प्रमाणपत्र वितरणासाठी यशस्वी चे महिला उद्योजक, परिसरातील मान्यवर व उद्योजिका उपस्थित होत्या.
श्रीमती स्मिता गोगटे लर्निग लिंक्स फाउंडेशन यांनी आभार व्यक्त केले. अविनाश टिकर लर्निग लिंक्स फाउंडेशन यांनी प्रशिक्षणाचे व्यवस्थापन केले. यशस्वी स्किल अकॅडमी चे सर्व स्टाफ यांनी या कार्यक्रमास खूप मदत केली.