इराण :
अंतिम सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतरही भारताच्या युवा खेळाडूंनी धडाकेबाज खेळ करत यजमान इराणचा ४१-३३ असा पराभव करत दुसर्या ज्युनियर जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.
याआधी पहिली स्पर्धासुद्धा इराणमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्यात इराणचा संघ विजेता ठरला होता.
मध्यंतरानंतर घेतलेली आघाडी झुंजार खेळ करीत शेवटपर्यंत नुसती राखली नाही तर वाढवलीसुद्धा. शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना हिंदुस्थान 33-30 असा आघाडीवर होता. पण या पाच मिनिटांत त्यांनी भन्नाट चढाया आणि मगरमिठी (सुपर टॅकल) मारत सामन्यावर अशी पकड घेतली की ती इराणला सोडवताच आली नाही. हिंदुस्थानने वेगवान चढाया करत शेवटच्या मिनिटाला 41-33 अशा गुणांसह इराणवर मात केली आणि कबड्डीच्या जागतिक स्पर्धेवर आपले नाव कोरले.