बाणेर :
सध्या परत विषाणूजन्य आजाराने खूप नागरिक आजारी आहेत. प्रत्येक ऋतू बदलाच्या वेळी विषम हवामान बदला मुळे विषाणू संसर्ग वाढतो. खरं तर आपल्या सगळ्यांना कोरोना ने सगळ्या गोष्टी शिकवल्या त्याच परत उजळणी करायची वेळ आली आहे. साधा मास्क वापरून जे आजारी आहेत त्यांनी तरी व सॅनिटायझर वापरून खूप प्रमाणात आळा बसेल.
हे विषाणूजन्य आजार कायम राहणार आहेत.
आपण त्यांना तोंड द्यायला सक्षम आपली प्रतिकार शक्ती तयार करायला पाहिजे. रोज न चुकता व्यायाम, चालणे, जिम, योगा काहीतरी केलं पाहिजे.
व्हिटॅमिन सी आवळ्या त खूप जास्त प्रमाणात असते असे पदार्थ घ्यावे. पाणी प्या फिराल्यामुळे सकाळी व्हिटॅमिन डी पण मिळू शकते त्याचा प्रतिकार शक्ती वाढविण्यााठी खूप चांगला उपयोग होतो. रात्री साध्या कोमट पाणी हळद मीठ गुळण्या पण खूप उपयुक्त ठरू शकतात.
सगळ्यात महत्वाचे मनाने औषधे घेऊ नका. खूपदा मनाने अँटिबायोटिक्स, स्टरोईड घेतले जातात त्याचा फायदा होण्या ऐवजी तोटा होऊ शकतो. वृद्धांनी व लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी.
डॉ राजेश देशपांडे
बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन
9371051710