प्राध्यापक होण्यासाठी आता यूजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) मधील पात्रता पुरेशी.

0
slider_4552

मुंबई :

प्राध्यापक होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी (UGC Update 2023) एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम जगदेश कुमार यांनी यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे.

त्यानुसार विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांवरील भरतीसाठी PHD अनिवार्य नसेल. प्राध्यापक होण्यासाठी आता यूजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) मधील पात्रता पुरेशी असणार आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा

देशातील विद्यापीठांमध्ये अध्यापन करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. याआधी विद्यापीठांमध्ये अध्यापनासाठी पीएचडी पदवी अनिवार्य होती. पण आता नव्या नियमामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

उस्मानिया विद्यापीठ कॅम्पसमध्ये नव्याने बांधलेल्या UGC-HRDC इमारतीचे उद्घाटन यूजीसी अध्यक्षांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘एक राष्ट्र-एक डेटा पोर्टल’ विकसित केले जात आहे, ज्यामध्ये सर्व यूजीसी मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर तपशील असतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढील शैक्षणिक वर्षापासून पारंपरिक पद्धतीतील शिक्षणासोबतच नॅशनल डिजिटल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

See also  भक्ती आणि शक्तीचं प्रतिक असलेलं पंढरपूर भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी