विनाअनुदानीत व प्रोफेशनल काॅलेजमध्येही करिअर कट्टा व उ्द्योजक संसद इनक्युबेशन सेंटर कल्पना राबवावी – डाॅ गजानन एकबोटे

0
slider_4552

गणेशखिंड :

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याशी सर्व सलंग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य व करिअर कट्टा समन्वयक यांची एक दिवसीय कार्यशाळा व सन २०२२-२३ या महाविद्यालयीन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १० मार्च २०२३ रोजी पार पडला.

या कार्यशाळेचे उद्घाटन साखर आयुक्त डाॅ शेखर गायकवाड यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी ते म्हणाले,” सर्वांचा राज्यस्तरीय सहभाग नविन शैक्षणिक धोरणासाठी महत्वाचा आहे. करिअर कट्टा व प्लेसमेंट सेल एकञ यावेत व यासाठी प्राध्यापकांनी प्रयत्न करावेत. करिअर कट्याचे सर्व उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत.’

डाॅ नंदकुमार निकम, अध्यक्ष, प्राचार्य राज्यमहासंघ म्हणाले,”उच्चशिक्षण क्षेत्रामधील सगळेच गोंधळलेले आहेत.करिअर कट्टयाने यासाठी मदत करावी. यासाठी छोट्या कार्यशाळा घ्याव्यात व त्याचा फिडबॅक राज्य सरकारला द्यावा.”

डाॅ दीनानाथ पाटील, विभागीय प्राचार्य प्रर्वतक, करिअर कट्टा यांनी आपले मत मांडले,” महाराष्ट्रातील तरुण स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडत आहे. त्यासाठी व उद्योजकतेचेही प्रशिक्षण देण्यासाठी करिअर कट्टा मदत करतो.”

मराठी टक्का स्पर्धा परिक्षेमधे वाढला पाहिजे. जवळ जवळ ४००० विद्यार्थ्यांच्या आभ्यास व्हावा यासाठी विरसावरकर ग्रंथालय उभे रहात आहे. असे सहकार्यवाह डाॅ जोत्स्ना एकबोटे म्हणाल्या.

मा यशवंत शितोळे, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र,अध्यक्ष करिअर कट्टा, डाॅ नितीन घोरपडे सत्काराला उत्तर देताना म्हणाले ” स्पर्धा परिक्षांचे नियोजन करताना विद्यार्थ्यांची योजना तयार पाहिजे. वेळ आल्यानंतर त्यांना तो राबविण्यासाठी करिअर कट्टा मदत करतो. यांच्या करिअरला हा कार्यक्रम वेगळी दिशा देऊ शकतो.”

डाॅ गजानन र एकबोटे कार्यवाह प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मार्गदर्शन करताना म्हणाले ” नॅशनल एज्युकेशन पाॅलिसीसाठी ग्रामीण भांगामधे जावे लागेल. व त्याचा उपयोग कसा करावा यासाठी एक कार्यगट कारावा. नॅशनल एज्युकेशन पाॅलिसीचे अनेक फायदे आहेत.विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढत आहेत. यासाठी अँडमिशनच्या वेळी विद्यार्थ्यांना रजिस्टर करुन घ्यावे.
विनाअनुदानीत व प्रोफेशनल काॅलेजमध्येही ही कल्पना राबवावी.”

See also  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करणार : अजित पवार

मागील वर्षी सगळ्या स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन महाविद्यालयात व आँनलाईन घरी असे उत्कृष्ट पद्धतीने दिलेल्या व विद्यार्थ्यांसाठी इतर अनेक उपक्रम साजरे केलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे, नगर व नाशिक मधील ३० महाविद्यालयांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

मा यशवंत शितोळे, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र,अध्यक्ष करिअर कट्टा यांनी उ्द्योजक संसद इनक्युबेशन सेंटरची माहिती देताना सांगितले
“उ्द्योजक संसद इनक्युबेशन सेंटर या नविन उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार टप कंपनी स्थापन केली जाईल. या कंपनीचे पदाधिकारी म्हणून विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. जसं की सीईओ एचआर हेड फायनान्स हेड इत्यादी पदे एका वर्षासाठी विद्यार्थ्यांना दिली जातील. तसेच त्यांनी या उद्योग संसदेमार्फत व्यवसाय करावा यासाठी दरवर्षी एक लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यांना व्यावसायिक तज्ञ लोकांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. तसेच १०० सेंटर्स आॅफ एक्सलन्स मध्ये १०००० विद्यार्थ्यांसाठी आभ्यासिका तयार होत आहेत. १०० शाॅर्ट टर्म्स कोर्सेसचे उद्घाटन स्किल डेव्हलपमेंट सेंटरचेही उद्धाटन या कार्यशाळेत झाले.

या प्रसंगी सी नेट पदी निवड झाल्यामुळे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिव डाॅ जोत्स्ना एकबोटे यांचा तर व्यवस्थापन समितीवर (Management Council) निवड झाल्याबद्दल प्राचार्य नितीन घोरपडे यांचा सत्कार डाॅ जोत्स्ना एकबोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
डाॅ दिनेश पवार यांचा MPSC समितीवर निवड झाल्याबद्दल व डाॅ के.सी. मोहिते यांना राज्यस्तरीय समितीवर निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यशाळेत पाहुण्यांचे स्वागत माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंडचे प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी केले. प्रास्ताविक आण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ नितीन घोरपडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन डाॅ श्रीकांत देशमुख, विभागीय समन्वयक करिअर कट्टा यांनी तर आभार प्रदर्शन डाॅ शिवाजी भोसले विभागीय समन्वयक करिअर कट्टा यांनी केले. कार्यशाळेस अंदाजे १२० जण सहभागी होते.