पिरंगुट :
परम पूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने व आदरणीय श्री चंद्रकांत दादासाहेबांच्या मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ साप्ताहिक सेवा केंद्र हिराजनगर पिरंगुट(दिंडोरी प्रणित) मध्ये केंद्राचा पहिला वर्धापनदिना निमित्ताने ग्रामअभियान व स्वामी समर्थ पालखी सोहळा आनंदाने साजरा करण्यात आला.







स्वामी समर्थांची पालखी हिराजनगर केंद्रातुन,पिरंगुट कॅम्प हाय स्कुल गणेश नगर, कुंभार वाडा, गोळे आळी मारुती मंदिर, पवळे आळी भैरवनाथ मंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळून पिरंगुट कॅम्प, हिराजनगर केंद्रा मध्ये पालखी आणली अशा प्रकारे पिरंगुट ला गोलप्रदक्षिणा घालण्यात आली यावेळी स्वामी समर्थ नामाचा नामघोष करण्यात आला. सोहळ्याला महिलांचा सहभाग जास्त प्रमाणात होता.
यावेळी कार्यक्रमांस उपस्थित असलेले श्री पंकज दादानी सर्व सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला पिरंगुट गावचे सरपंच चांगदेव नाना पवळे, माजी उपसरपंच विकास पवळे सामाजिक कार्यकर्ते विजय पवळे,सोनल हरसुले,उद्योजक बाबासाहेब पवळे,ललिता ताई पवळे, हिंजेवडी केंद्र प्रमुख साखरे ताई, स्वामीसेवेकरी देवकर साहेब, गायकवाड साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन बसवराज बिन्नी, अशोक वरघुडे, स्वप्नील नळे, शैला बिन्नी, कल्याणी खेडेकर, मंगल साठे, संगीता ठाकरे, ज्योती नवाळे, अनिता पवळे, नंदा सस्ते, मीरा पाटील, हेमा वाघ, सुनीता कुदळे, मनीषा नळे, पौडकेंद्र, लवळेकेंद्र या सर्व सेवेकऱ्यांनी केले होते.








