गणेशखिंड :
गणेशखिंड येथिल माॅडर्न महाविद्यालयात कॅलिडोस्कोप खंड 15 चा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. कॅलिडोस्कोप हे गेल्या 15 वर्षांपासून मानसशास्त्र विभागाने प्रकाशित केलेले इन हाउस जर्नल आहे. यावर्षीची थीम ‘जीवन हा संघर्ष’ अशी होती. इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेतील लेख आणि कविता असलेले जर्नल त्रिभाषी आहे. यात कलाकृतीही आहे . याचे मुखपृष्ठ विद्यार्थिनी कु तनया जाधव हिने डिझाइन केले आहे.
मागील १५ वर्षात प्रेम, आनंद, व्यसनाधिनता, भारत मानसशास्त्राचे 100 वर्ष, जगावर प्रभाव पाडणारे मानस असे अनेक मानसशास्त्रीय विषयावर लिहिण्यात आले आहे. या वर्षाचा अंक ‘जीवन हाच संघर्ष’ हा होता. या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे लेखक, कथा, कादंबरीकार, नाटककार डॉ. प्रदीप आवटे (सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन) होते.
या अंकात निवडक लेख , कविता, चित्र इ. चा समावेश होता. व्यसनमुक्ती, कोविड 19 आणि मानसिक आरोग्य, आनंद, जीवन रंगीत आहे इत्यादी विषयावर यात लिहिण्यात आले आहे.
विद्यार्थी यामुळे थीमॅटिक लेखन, मुलाखती, सर्वेक्षण आणि संशोधन लेखनाची कौशल्ये शिकतात. हे जर्नल परदेशातील विविध राज्ये आणि देशांत पोहोचले आहे.
यासाठी प्राचार्य डॉ.संजय खरात यांनी मार्गदर्शन केले. डॉ. साधना नातू, प्रमुख, मानसशास्त्र विभाग यांनी उपक्रमाची संकल्पना मांडली. प्रा. नशोम क्रॅस्टो आणि प्रा. स्वाती जगताप यांनी सहकार्य केले. विद्यार्थी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, पालक आणि माजी विद्यार्थी अशा १०० हून अधिक लोक कार्यक्रमाला उपस्थित होते. उपक्रमाचे नियोजन, अँकरिंग सर्व विद्यार्थ्यांनी केले.
मानसशास्त्र विभागाचा आणखी एक अतिशय उपयुक्त उपक्रम म्हणजे” सायवर्ल्ड”. हा मध्ये विद्यार्थ्यांना पोस्टर, पीपीटी, मनोवैज्ञानिक थीम आणि मिथ बस्टिंगवर इंटरएक्टिव्ह गेम्स तयार करण्यासाठी 2 महिने प्रशिक्षण दिले जाते. लिंग मानसशास्त्र, संज्ञानात्मक मानसशास्त्र, आंतरविद्याशाखीय मानसशास्त्र यासारख्या थीम गेल्या 5 वर्षांत हाताळल्या गेल्या आहेत. सायवर्ल्डसाठी जवळपास 500 फूटफॉल्स उपस्थित असतात. हा अतिशय लोकप्रिय उपक्रमात व्यक्तिमत्व ओळखून त्याचे विश्लेषण केले जाते व मानसिक समस्येवर समाधान सांगितले जाते. या उपक्रमासाठी सर्वांना आमंत्रण आहे.