वेताळ टेकडी वाचविण्यासाठी जोरदार मोर्चा काढून भरपावसात पर्यावरण प्रेमींनी केला निषेध..

0
slider_4552

पुणे :

पुणे महापालिका प्रशासनाने घेतलेल्या वेताळ टेकडी फोडून रस्ता करण्याचा निर्णय विरोधात टेकडी बचाव कृती समितीकडून जोरदार मोर्चा काढून निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणा देत नागरीक रस्त्यावर उतरले.

वेताळ टेकडीवरून बालभारती ते पौड फाटा हा रस्ता पुणे महानगर पालिका बनविण्याचा घाट घालत आहे त्याला नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. म्हणूनच वेताळ टेकडी बचाव कृती समितीकडून विरोध करण्यासाठी शनिवारी सेनापती बापट रोडवरील वेताळ बाबा चौक ते जर्मन बेकरी पर्यंत पदयात्रा काढण्यात आली.

मोर्चा ला सुरूवात होताच पावसाने हजेरी लावली परंतू तरी देखिल पर्यावरण प्रेमींनी मोर्चा थांबवला नाहि जोरदार घोषणा देत प्रशासनाच्या निर्णय विरोधात आपला रोष व्यक्त केला.

यावेळी कृती समितीचे सदस्य आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच खसदार ऍड. वंदना चव्हाण, माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी, मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, गजानन थरकुडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, दत्ता बहिरट, गटनेते पृथ्वीराज सुतार, गोपाळ तिवारी, संगिता तिवारी, डॉ. अभिजीत मोरे, रणजीत शिरोळे यांनी देखिल सहभाग घेतला.

See also  पुणे बार असोसिएशन तर्फे व्याख्यान व सन्मान सोहळा संपन्न..