बाणेर गाव ते मुरकुटे गार्डन रस्त्याने पीएमपीएल बसचा नवीन रूट सुरू, माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या प्रयत्नांना यश..

0
slider_4552

बाणेर :

माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर व भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या मागणीला यश आले असून, त्यांनी नागरीकांची मागणी लक्षात घेत नागरिकांना प्रवास करण्यास होणारी गैरसोय थांबावी म्हणून पीएमपीएमएल बस सेवा रुट बदल व्हावा अशी मागणी वारंवार पाठपुरावा करत पीएमपीएमएल प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने दखल घेत त्यांच्या मागणी नुसार नागरिकांची होणारी गैरसोय दुर व्हावी म्हणून पीएमपीएमएल बस चा रूट बदलण्यात आला आहे.

नागरिकांनी अश्या प्रकारे बस सेवा सुरु करावी अशी मागणी केली होती विशेषतः जेष्ठ नागरिकांची सोसायटी म्हणून ओळखली जाणारी अथश्री सोसायटी यांची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती तसेच ग्रीन झोन सोसायटी, मोहन नगर भागातील नागरिक वारंवार मागणी करत होते या मागणीचा विचार करून नगरसेविका ज्योती कळमकर व भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी पाठपुरावा करून हि बस सेवा सुरु करून घेतली

याबद्दल माहिती देताना माजी नगरसेविका ज्योती ज्योती कळमकर यांनी सांगितले की, बाणेर गावच्या दक्षिण भागात खूप मोठया प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. परंतु या भागातून कोणतीही सार्वजनिक बससेवा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. हे लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांची अडचण दुर व्हावी म्हणून पीएमपीएमएल प्रशासनाकडे बाणेरगाव, मुरकुटे गार्डन,बिट वाईज चौक, या भागातून बस रूट सूरु करावा अशी मागणी निवेदन देऊन केली होती. पीएमपीएमएल प्रशासनाने आमच्या मागणीचे गांभीर्य ओळखून त्वरित पीएमपीएमएल बसचा रूट बदलला व या परिसरात नागरिकांची अडचण दुर केली त्याबद्दल नागरीकांच्या वतीने मी सर्व सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आभार मानते.

पुढे माजी नगरसेविका ज्योती कळमकर म्हणाल्या की, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष सहकार्य केल्यामुळे हि बस सेवा सुरु झाली आहे. नागरिकांनी देखिल या पीएमपीएमएल बस सेवेचा रूट नुसार लाभ घ्यावा व स्वतः ची गैरसोय टाळावी अशी विनंती आहे. परिसरातील नागरिकांच्या समस्या दूर करणे हे आमचे कर्तव्य समजून आम्ही नेहमीच नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी तत्पर असतो असे त्यांनी यावेळी माहिती देताना सांगितले.

See also  राहुल बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त "होम मिनिस्टर(खेळ रंगला पैठणीचा)" कार्यक्रमाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद.