माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ नागरिकांनी पाहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ चा शंभरावा भाग..

0
slider_4552

बाणेर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभराव्यांदा मन की बात या कार्यक्रमांतून देशवासियांशी मनमोकळा संवाद साधला. आणि पुन्हा नेहमी प्रमाणे सगळ्यांची मने जिंकली. हा कार्यक्रम नागरिकांसोबत एकत्रित रित्या अनुभवता यावा म्हणून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा कोथरुड विधानसभा मतदार संघाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष लखन कळमकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ बाणेर येथे कै ह भ प बाबुराव सायकर (गणराज ) चौकात देखील नागरिकांना एकत्रितरित्या हा कार्यक्रम पाहता यावा म्हणून भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या वतीने आयोजन केले होते.

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा शंभरावा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्रं मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी असा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त पत्रे वाचेन, पाहीन आणि संदेशांना जरा समजण्याचा प्रयत्न करावा. आपली पत्रं वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो, भावनांनी ह्रदय उचंबळून आलं आणि भावनामध्ये वाहूनही गेलो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या शंभराव्या भागासाठी अभिनंदन केलं आहे. परंतु मी खरोखर सांगतो की वास्तविक पहाता अभिनंदनास पात्र तर आपण सर्व मन की बातचे श्रोते आहात, आमचे देशवासी आहेत. मन की बात कोटी कोटी भारतीयांची मन की बात आहे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे. असे म्हणत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचेच मने जिंकली.

३ ऑक्टोबर २०१४ या दिवशी विजयादशमी दिवशी सूरु झालेला मन की बात हा कार्यक्रम अनेक वर्ष सरत आज नंबर हवा भाग पूर्ण करत आहे. हा कार्यक्रम माजी नगरसेविका ज्योती कळमकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा कोथरुड विधानसभा मतदार संघाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष लखन कळमकर यांनी नागरिकांसोबत एकत्रित रित्या बसुन पाहिला.

या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर म्हणाले की, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक शब्द नेहमीच प्रेरणादायी असतो. ते सतत भारतीय नागरिकांना येणाऱ्या अडचणी कशा सोडवता येईल यासाठी प्रयत्नशील असतात. देशासाठी अहोरात्र काम करण्याची पद्धत आम्हा सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरते. आज देखील माननीय पंतप्रधानांच्या प्रत्येक शब्द गणिक नागरिकांना व आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळत होती. हा कार्यक्रम पाहताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत याचा निश्चितच आम्हाला अभिमान वाटत आहे. शेवटी एकच म्हणेल धन्यवाद ‘मोदीजी’

See also  कोरोना वाढत असून नागरिकांनी जास्तीत जास्त काटेकोरपणे नियमांचे पालन करावे : बाबुराव चांदेरे