ऐतिहासिक १०० वा ‘मन की बात’ संवाद कार्यक्रम मा. स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी पाहिला सुतारवाडी येथे सहकाऱ्यांसोबत..

0
slider_4552

सुतारवाडी :

आज पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक १०० वा ‘मन की बात’ हा संवाद कार्यक्रम माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी स्वतः च्या जनसंपर्क कार्यालय मध्ये युवा कार्यकर्त्यांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत पाहिला.

याबद्दल माहिती देताना युवा नेते माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी सांगितले की, मा.नरेंद्रजी मोदी हे प्रत्येक महिन्यात देशातील नागरिकांना विकासात्मक योजना आणि आपण करत असलेल्या कामाची माहिती देत असतात. आजचा मन की बात हा कार्यक्रम युवा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत ऐकला.

पुढे त्यांनी सांगितले आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत चळवळ, बेटी पढाओ.. बेटी बचाओ, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मन की बात ही जनआंदोलन बनली आहे. या कार्यक्रमात मी सदैव तुमच्यासोबत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. हा कार्यक्रम नसून श्रद्धा, उपासना आणि व्रत आहे, अशी भावना व्यक्त केली. आजचा शतकीय ‘मन की बात’ हा कार्यक्रम आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन जातो.

See also  बाणेर-पाषाण टेकडीच्या पायथ्याशी बेकायदेशीररित्या राडारोडा टाकून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी.