नवचैतन्य हास्य क्लब बालेवाडी सीनिअर सिटिझन यांच्यासाठी युरोकुल हॉस्पिटल मधे चर्चासत्र व तपासणी.

0
slider_4552

बाणेर :

आज युरोकुल हॉस्पिटल बाणेर येथे नवचैतन्य हास्य क्लब बालेवाडी येथील सुमारे ६० सीनिअर सिटिझन यांच्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

प्रसिद्ध यूरोलोजिस्ट व भारताच्या युररोलॉजी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ संजय कुलकर्णी तसेच भारतील प्रथम स्त्री लप्रोस्कोपी सर्जन डॉ ज्योस्ना कुलकर्णी यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केले . प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढ ,कॅन्सर तसेच किडनी, मूत्रमार्ग यांच्या आजाराविषयी व त्यांच्या आधुनिक उपाचारा विषयी माहिती दिली . डॉ जोस्ना कुलकर्णी यांनी लाप्रोस्कोपिक सर्जरी विषयी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले.

डॉ सुहास मोंढे नेफ्रोलॉजिस्ट यांनी डायलिसिस, किडणी विषयी माहिती दिली. आलेल्या सर्व सीनिअर सिटिझन याची मोफत सोनोग्राफी टेस्ट तसेच urine flow टेस्ट करण्यात येईल.

ह्या प्रसंगी श्री गणपत बालवडकर अध्यक्ष व ॲड श्री माशेलकर, डॉ निखारे, डॉ राजेश देशपांडे बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन व ६० सीनिअर सिटिझन उपस्थित होते.

यूरोकुल हॉस्पिटल तर्फे डॉ प्रमोद भावे , डॉ साकेत पटवर्धन, डॉ सौ भुजबळ, सौ कुलकर्णी नर्सिंग हेड उपस्थीत होते.

See also  लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी : निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे