बुद्धजयंती निमित्त बोपोडीत बालजत्रेचे आयोजन, मुलांचा उस्फूर्त प्रतिसाद..

0
slider_4552

पुणे :

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती बोपोडीत उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त येथे बालजत्रा व स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते.

मा.नगरसेवक प्रकाशजी ढोरे, भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने,भाजप शिवाजीनगर मंडल सरचिटणीस आनंद छाजेड तसेच सपनाताई छाजेड यांच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला विनोद रणपिसे, औंध बोपोडी प्रभागाचे अध्यक्ष गणेश स्वामी, सचिन घोरपडे, माणिक गायकवाड, ताराचंद ढोबळे, विजय ढोणे, अमोल ओव्हाळ, सुभाष पाडळे, राजेश माने, संकेत कांबळे, जे नित्यानंद, संतोष भिसे, राजाराम भिंगारे, शाम भालेराव, संदीप चौरे, अनिल माने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सध्या मुलांना उन्हाळी सुट्टी लागली असून मुलांनी त्यांच्या आवडीच्या खेळांची मनसोक्त मजा घ्यावी या हेतूने येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्याना समोर बालजत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या बालजत्रेत मुलांनी मनोरंजनाच्या खेळांचा आनंद घेत धमाल मस्ती केली. याचप्रमाणे बुद्ध जयंतीच्या निमित्ताने येथील नागरिकांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. नागरिकांनी याचा आस्वाद घेतला.

See also  राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदवी प्रदान समारंभ बंद करणार : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील