१८ मे पासून दर गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

0
slider_4552

पुणे :

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट टळल्याचे बोलले जात होते. मात्र आता आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

१८ मे पासून पुणे शहरात एकदिवसीय पाणीकपात लागू होणार आहे. १८ मे पासून दर गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ९.७० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच यंदा अल निनोचं संकट ओढावण्याची शक्यता असल्याने पर्जन्यमान कमी राहणार आहे. पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला ऑगस्टपर्यंतचे नियोजन करावे लागते. मात्र यंदा पाणी साठी कमी असल्याने त्यातच पाऊस कमी प्रमाणात होणार आहे. यामुळे पाणी पुरवठा जपून करावा किंवा पाण्याचं योग्य नियोजन करण्यात यावं, अशा सूचना देण्यात आल्या आहे.

येत्या काही दिवसात मोठा पाऊस झाल्यास पाण्याची कमतरता भासणार नाही. मात्र दोन महिने पाऊस लांबल्यास भविष्यात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येत्या १८ मेपासून पुणे शहरात प्रत्येक गुरुवारी पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं पाणी पुरवठा विभागाने सांगितलं आहे.

महापालिकेने सांगितले की, शहरात २० ठिकाणी एअर व्हॉल्व बसवले आहेत. त्यामुळे अधिक दाबाने पाणी मिळेल. पाऊस कमी पडल्यास अत्यावश्यक नियोजन मनपा प्रशासन करत हेत. आजूबाजूच्या गावातून पाण्याचे टँकर आणता येतील तसेच टँक बंद ठेवता येतील. मुळशीमधून पाच टीएमसीची मागणी केली आहे.

https://twitter.com/PMCPune/status/1655822359838744578?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1655822359838744578%7Ctwgr%5Ec92bcfd7faa2eec2336f864b6055735f6bc924ad%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  सरकार हमी भाव कायदा आणणारा का? : मेधा पाटकर