बाणेर :
मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील
गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता कोंम्बींग ऑपरेशन, अंमली पदार्थ तस्करी करणारे गुन्हेगार यांची माहिती
काढुन कडक कारवाई करण्याच्या सुचना व आदेश दिले आहेत.







वरिष्ठांनी दिलेले आदेश व सुचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक – ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री. विनायक गायकवाड यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ यांना त्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुशंगाने दिनांक १०/०५/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ कडील अधिकारी व स्टाफ चतृश्रुंगी पोलीस ठाणे, पुणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार, पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे बाणेर येथील १०२ अश्वमेघ हाऊस, युक्तिका सोसायटीच्या समोरील सार्वजनिक रोडवर एक परदेशी नागरिक हा त्याचे ओळखीचे लोकांना कोकेन हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे.
त्यानुसार इकडील विभागाकडील अधिकारी व स्टाफने सदर ठिकाणी सापळा रचुन एक परदेशी नागरीक, वय-४३ वर्षे, रा.सी- ९०२, याश्वीन सोसायटी, बाणेर-सुस रोड, सुस, पुणे यांस ताब्यात घेवुन, त्याची झडती घेतली असता, त्याचे ताब्यात एकुण ५,६९,५००/- रुकिचा ऐवज, त्यामध्ये २२ ग्रॅम ०४० मिलीग्रॅम “कोकेन” ४,४८,००० /- किमतीचा, एक मोटार सायकल ५०,०००/- रू किची, ५४,५००/- रूपये रोख रक्कम व ०४ मोबाईल हॅण्डसेट १७,०००/-रू किचे असा ऐवज हा अंमली पदार्थासह अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला म्हणुन त्यांचे विरुध्द व त्याचे साथीदार विरुध्द चतृ; श्रुंगी पो स्टे गुरनं. ३१७ / २०२३, एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत पोलीस अंमलदार सचिन माळवे यांनी चतृ;श्रुंगी पो. स्टे. येथे फिर्याद दिली आहे.
मा.पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे -१, श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, मनोज कुमार साळुंके, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, राहुल जोशी, सचिन माळवे, नितेश जाधव, रेहाना शेख, विशाल शिंदे, योगेश मोहिते यांनी केली आहे.







