राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्र लढणार..

0
slider_4552

मुंबई :

र्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Pawar house यांच्या मुंबईतील निवासस्थानी महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) नेत्यांची बैठक झाली.

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्र आणि पूर्ण ताकदीने लढेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी माध्यमांना दिली.

राज्यातील उष्णता कमी झाल्यावर लगेच आघाडीच्या वज्रमूठ सभांना सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक रविवारी सायंकाळी पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राकाँचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप आणि अन्य नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर (Maharashtra elections) महाविकास आघाडीची संयुक्त पत्रपरिषद झाली. त्यात बैठकीतील चर्चेची माहिती जयंत पाटील यांनी दिली. महाविकास आघाडी म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी चर्चा केली. उन्हाळा असल्याने आघाडीच्या सभा थोड्याशा प्रलंबित ठेवल्या आहेत. पावसाचे वातावरण पाहून सभा सुरू करणार आहोत. तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि आघाडीतील अन्य पक्षांशी चर्चा करून लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत निर्णय घेणार आहोत. भाजपाला महाराष्ट्रात महाविकास आघाडी अधिक सक्षमपणे पर्याय म्हणून उभी राहील, असे जयंत पाटील म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कर्नाटकच्या जनतेत भाजपाविरोधात रोष होता. तो मतपेटीतून व्यक्त झाला आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. पुढील सभा पुण्यात होणार असून, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा यावेळी सत्कार करण्यात येईल.

See also  राज्यातील 800 शाळा बोगस,त्यापैकी 100 शाळा कायमस्वरुपी बंद..