रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय, मुंबई प्ले ऑफ मधे…

0
slider_4552

बंगलोर :

आयपीएल 2023 मधील अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवरील झालेल्या या सामन्यात आरसीबी प्ले ऑफ्सचे तिकिट पक्के करण्याच्या इराद्याने उतरला.

विराट कोहली याने झळकावलेल्या शतकानंतर शुबमन गिलने धावांचा पाठलाग करताना आणखी एक शतक पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. यासह आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर, मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरमध्ये जागा बनवली.

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 197 धावा केल्या. संघासाठी, विराट कोहलीने 61 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 101 धावांचे शतक झळकावले.

मात्र, शुभमन गिलच्या शतकाने कोहलीच्या नाबाद शतकाची छाया पडली. धावांचा पाठलाग करताना गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलने 52 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 104 धावा करून सामना जिंकला.

See also  प्रो कबड्डी स्पर्धेत दिवसातील तिन्ही सामने टाय