सोमेश्वरवाडी येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.. रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन !

0
slider_4552

पुणे :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार (ता.४) जून २०२३ रोजी, सोमेश्वर मंदिर, सोमेश्वरवाडी , पाषाण (पेठ जिजापुर) या ठिकाणी करण्यात आले आहे.

शिबीराचे आयोजन सोमेश्वर देवस्थान, सोमेश्वर फाउंडेशन, विठ्ठल सेवा मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आले असून यासाठी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

उन्हाळा आणि शाळा महाविद्यालयांना लागलेल्या सुट्या यामुळे पुढील पंधरा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा काही रक्तपीढ्यात शिल्लक आहे. काळाची गरज ओळखून स्वराज्याचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे असे आवाहन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केले.

काय? :भव्य रक्तदान शिबीर
कुठे?: सोमेश्वर मंदिर, सोमेश्वरवाडी, पाषाण (पेठ जिजापुर). पुणे
कधी ? :रविवार ४ जून २०२३
केव्हा? : सकाळी ९ ते सायं ४ वाजेपर्यंत

See also  लता दीदींनी देशासाठी नेहमीच आपल्या आवाजाने प्रेम व्यक्त केले : डॉ. दिलीप मुरकुटे.