अयोध्येतील राम मंदिरासाठी निधी संकलनाचा बाणेर बालेवाडी इथे शुभारंभ.

0
slider_4552

बाणेर :

राम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्यात येत आहे. ते मंदिर भारतातील संपूर्ण हिंदू जनता स्वखर्चाने बांधणार आहे. प्रत्येक हिंदूंचा खारीचा वाटा तरी राहील ह्या उद्देशाने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट निधी संकलनाचे अभियान संपूर्ण भारतात करत आहे.

बाणेर गावाच्या अभियानाचा शुभारंभ आज सकाळी झाला. गावातील रामभक्तांनी दि. १५ रोजी सकाळी प्रभात फेरी काढून ह्याची सुरुवात केली. प्रभात फेरी बाणेर श्री राम मंदिर इथून सुरवात होऊन, बाणेर रस्ता मार्गे जात, बालेवाडी फाट्यावरून परत श्रीराम मंदिरात सांगता झाली. प्रभात फेरीत साधारण १५० ग्रामस्थांनी भाग घेतला.

ह्या राम मंदिर निधी संकलन अभियानाची सुरुवात श्रीराम नवमी हनुमान जयंती उत्सव समिती ट्रस्टने १,२५,००० रूपयाच्या धनादेशाने झाला.

रामभक्तांनी सर्व बाणेर बालेवाडी रहिवाशांना राम मंदिरासाठी भरघोस निधी द्यावा असे आवाहन प्रभात फेरीच्या दरम्यान करण्यात आले. हे अभियान ३१ जानेवारी पर्यंत चालणार आहे.

See also  कोरोना वाढत असून नागरिकांनी जास्तीत जास्त काटेकोरपणे नियमांचे पालन करावे : बाबुराव चांदेरे