वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन च्या वतीने वार्डांची नेमणूक…!

0
slider_4552

सुस :

सुसगाव परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुस गावमध्ये सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सुस गावठाण परिसरात अरुंद रस्त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या ठिकाणी नागरिकांना तासंतास वाहतूक कोंडीत उभे राहावे लागत होते. १-२ किमी लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत.

या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन च्या वतीने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले वॉर्डन वाहतूक पोलिसांच्या सहकार्य साठी व नागरिकांच्या मदतीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

अमोल बालवडकर म्हणाले, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणे तसेच वाहतूक नियोजन सुरळीत होण्यासाठी मदत व्हावी यासाठी हे वॉर्डन कार्यरत राहणार आहेत.

See also  गणेश कळमकर यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून घातले पंढरीच्या पांडुरंगाला साकडे.