गणेश कळमकर यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून घातले पंढरीच्या पांडुरंगाला साकडे.

0
slider_4552

बाणेर :

पंढरपूरची वारी निघाली की अवघा महाराष्ट्र विठू माऊलीच्या गजरात दुमदुमून जातो. पंढरपूरची वारी निघाली की महाराष्ट्राचे वातावरण भक्तिमय होते. अशा वेळी एकीकडे पंढरपूरची पायी वारी निघाली असताना अवघ्या महाराष्ट्राच्या विठु माऊलीला पांडुरंगाला अभिषेक घालण्याचे महापूजा करण्याचे भाग्य लाभणे म्हणजे अतिशय दुर्मिळ. भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर आणि त्यांच्या पत्नी कार्यक्षम नगरसेविका ज्योती कळमकर या दांपत्यास आपल्या कुटुंबासह विठू माऊली ला अभिषेक करण्याचे भाग्य लाभले.

याबद्दल माहिती देताना भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर म्हणाले अवघा महाराष्ट्र ज्याच्या पायाशी नतमस्तक होतो अशा महाराष्ट्राच्या विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन महापूजा, अभिषेक करण्याचे भाग्य माझ्या कुटुंबाला लाभले यासारखे नशीबवान गोष्ट वेगळी ती काय. माऊलीच्या चरणी नतमस्तक होताना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ चालू आहे, त्यात बदल घडावा म्हणून पंढरीच्या पांडुरंगाला साकड घातलं की, येणाऱ्या आषाढी एकादशीला महाराष्ट्रच भलं करणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशीला देवा तुझी सेवा करण्याचा मान मिळावा.

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रला चांगले भक्कम सरकार मिळेल महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनातील इच्छा, नागरिकांनी 2019 साली दिलेला कौल पांडुरंग नक्की पूर्ण करेल. लवकरच महाराष्ट्राला देवेंद्र फडणीस सारखे उमदे नेतृत्व प्राप्त होईल. आमची इच्छा पांडुरंग नक्की पूर्ण करेल अशी भावना गणेश कळमकर यांनी व्यक्त केली.

See also  वसुंधरा अभियान बाणेर चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा