बावधन :
बावधन गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुर्यकांत भुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बकाजी कॉर्नर, बावधन या ठिकाणी आय लव्ह बावधन या सेल्फी पॉईंटचे अनावरण, परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृद्ध माता-भगिनींना छत्री वाटप आणि वृक्ष वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते.
आपल्या समाजकार्याचा ठसा पंचक्रोशी मध्ये उमटविणारे, स्वकर्तुत्वाने लोकांची सेवा करणारे आणि मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व असणारे सूर्यकांत भुंडे यांनी आपला वाढदिवस देखील आपल्या स्वभावाला साजेल अशा पद्धतीने सामाजिक उपक्रमातून साजरा केला. गावाचा अभिमान वाटावा असा सेल्फी पॉईंट तयार करून त्याचे अनावरण केले. त्यामुळे निश्चितच गावाची शोभा वाढणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना साहित्य, वृध्द माता-भगिनींनसाठी छत्री आणि पर्यावरणाचा विचार करून वृक्ष संवर्धन करण्याकरिता वृक्ष वाटप उपक्रमांनी आपला वाढदिवस साजरा केला.
अशा या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील माता-भगिनी वयोवृद्ध आणि ग्रामस्थ तसेच माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, बबनराव दगडे, बालम सुतार, योगेश सुतार, आझाद दगडे, सचिन दगडे, अभिजीत दगडे, सविता दगडे, राजेंद्र अण्णा भुंडे, राजेंद्र बांदल, दत्तात्रय दगडे, निलेश दगडे, गणपत भुंडे, बाळासाहेब भुंडे, कुंडलीक दगडे, मयुरी तोडकर, मंदार घुले, बाप्पुसाहेब दगडे, वनराज दगडे, रोहिनी सुतार, आशा भुंडे, शितल दगडे, कल्पना घुले, मनीषा भोसले, रंजना दगडे, सुनिता कांबळे, रेश्मा दगडे, रेश्मा केदारी, उज्वला जाधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.