हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई यांना 21 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

0
slider_4552

पुणे :

धनंजय देसाई यांच्या सांगण्यावरून काही जणांनी देसाई यांना जमीन लिहून देण्यासाठी एका शेतकरी तरुणावर दबाव टाकत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

धनंजय उर्फ भाई जयराम देसाई, रोहित संजय काकतकर, श्याम विलास सावंत, निखील आनंद आचरेकर, सुरज रमेश मेहरा, कुणाल आनंद निकम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकरी आहेत. त्यांच्या शेजारीच धनंजय देसाई यांची जमीन आहे. गेल्या काही दिवसांपासून देसाईकडून त्यांना जमीन देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. आज दुपारी पुणे सत्र न्यायालयात देसाई यांना हजर करण्यात आले होते.

See also  मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार...