सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारानी घेतला पुण्याच्या प्रकल्पाचा आढावा

0
slider_4552

पुणे –

शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभार्गी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रथमच पुणे शहर वजिल्ह्यातील विकास प्रकल्पांचा ऑनलाइन बैठकीत आढावा घेतला. राज्य सरकारतर्फे काय मदत लागणार अर्सेल तर त्या संदर्भात प्रस्ताव पाठवा, आवश्यक ती मदत केली जाईल, अशी सूचना पवार यांनी अधिकाऱ्याना केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. त्यामुळे ते दर शुक्रवारी किंवा शनिवारी विधान भवन येथे बैठक घेऊन शहर व जिल्ह्यातील कामांचा आढावा घेत होते. राज्यात शिंदे, फडणवीस सरकार आल्यानंतर अजित पवार हे विरोधीपक्षनेते होते. त्यामुळे आठवड्याच्या आढावा बैठका बंद झाल्या.

गेल्याच महिन्यात अजित पवार यांनी बंड करून शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या सरकारमध्ये अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुमारे एक महिना ते पुण्यात आलेले नव्हते. पण गैेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचे पुणे दौरे सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी आज दुपारी महापालिका, जिल्हा प्रशासन, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए ) यासह इतर विभागाच्या अधिकार्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्दारे बैठक घेतली.

त्यामध्ये पुणे शहर व जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्य:स्थिती काय आहे याची माहिती घेतली. पुण्यातील मुळामुठा सुधार प्रकल्प, नदी काठ सुधार, समान पाणी पुरवठा, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो, पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल, चांदणी चौक उड्डाणपूल, पुणे नाशिक रेल्वेचे भूसंपादन, रिंग रोडचे भूसंपादन या प्रकल्पांबाबत चर्चा केली. तसेच पुणे शहरात प्रस्तावित असलेल्या खडकवासला ते खराडी मेट्रो, पौडफाटा ते माणिकबाग या प्रकल्पांचीही माहिती घेतली.

शहर व जिल्ह्यातील प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारतर्फे काही मदत आवश्यक असल्यास त्याबाबत माहिती सादर करा, असे अधिकाऱ्याना सांगितले. शिवाजीनगर -हडपसर मेट्रोसाठी स्वतंत्र बैठक शहरात शिवाजीनगर ते हडपसर मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. या मार्गाचे काम करण्यासाठी पीएमआरडीए आणि महामेट्रो या दोन्ही संस्थांनी तयारी दर्शविली आहे. पण नेमके काम कोणी करावे यावर एकमत झालेले नाही. अजच्या बैठकीतही यावर चर्चा झाली, पण त्यावर तोडगा निघू शकला नाही. त्यावर अजित पवार यांनी यासंदर्भात स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल, असे अधिकाऱ्याना सांगितले.

See also  रुग्णवाहिकांचे सायरन विनाकारण वाजविल्यास दंडात्मक कारवाई होणार