रांजणगाव इथे उभेराहणार इलेक्ट्रॉनिक्स मेन्युफॅक्चरिंग क्लस्टर’, कैंद्राकडून 62.39 कोटींचा निधीराज्य सकारकडे वर्ग

0
slider_4552

पुणे :

पुण्याजवळील रांजणगाव येथे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ (EMC) प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील 62 कोटी 39 लाख रुपये एमआयडीसीकड़े वर्ग केले आहेत.

पुण्याजवळील रांजणगाव येथे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार इलेक्ट्रॉनिक्स मन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ (EMC) प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील 62 कोटी 39 लाख रुपये एमआयडीसीकड़े वर्ग केले आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कैंद्र शासनाचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने 31 ऑक्टोबर 2022 रोजी रांजणगाव येथे 29711 एकर जागेवर’इलेक्ट्रॉनिक्स मेन्युफॅक्वरिंग क्लस्टर’ उभारणीस मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी 492 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 208 कोटी रुपये केंद्राचा हिस्सा असून यातील पहिल्या टप्प्यातील 62 कोटी 39 लाख रुपये केंद्राने एमआयडीसीकडे वर्ग केले आहेत.

रांजणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात ॥FB, LG आणिे Gogoro EVSooter यासारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. या प्रकल्पामुळे हा परिसर इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येईल, अथिक उद्योजक, कंपन्या तेथे आकर्षित होऊन त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. हे EMC कार्यन्वित करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीने विशेष परिश्रम घेतल्याचे सांगून त्यांचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले.

See also  महाराष्ट्र पोलिसांची ओळख जगातील सर्वोत्तम पोलीस दल व्हावे म्हणून प्रयत्नशील : मुख्यमंत्री