पुणे :
खासदार वंदना चव्हाण यांनी जागतिक तापमान वाढीचे संकट लक्षात घेवून शहरी भागात ऑक्सिजन पार्क ची निर्मिती झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आग्रही भूमिका ठेवली पाहिजे असे स्पष्ट मत व्यक्त केले.
खासदार चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या युथ कनेक्ट या उपक्रमअंतर्गत रविवार दिनांक १७/१/२०२१ रोजी सकाळी ७ वा. तुकाई टेकडी वरील जैवविविधता उद्यान ,बाणेर येथे भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युथ कनेक्ट च्या तरुणांना वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून चालू आसलेल्या वृक्ष लागवड व संगोपन यांची माहिती व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी वंदना चव्हाण यांनी वसुंधरा अभियाना अंतर्गत केलेल्या कामाचे कौतुक केले.
त्यांचे समवेत बीव्हीजी ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड ही उपस्थित होते. त्याच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. वसुंधरा अभियानाचे पांडुरंग भुजबळ, आप्पासाहेब पोकळे व संजय मुरकुटे व त्यांचे सहकारी यांनी उपस्थित तरुणांना विविध वृक्षाची व टेकडीवर चालू आसलेल्या पर्यावरण पूरक उपक्रमांची माहिती दिली. या वेळी चव्हाण व हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते वसुंधरा अभियानच्या सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुषमा निम्हण,सनी मानकर, डॉ सुनिल जगताप , नितीन कळमकर तसेच युथ कनेक्टचे सुशांत ढमढेरे, महेश हांडे, राकेश कामठे, उपस्थित होते. या प्रसंगी स्वागत सुषमा सातपुते यांनी केले तर आभार युथ कनेक्ट चे अध्यक्ष राहुल पोटे यांनी मानले.