बालेवाडीतील गणेश मंडळांचे मंदिराच्या प्रतिकृतीचे देखावे…

0
slider_4552

देखावे गणेश मंडळाचे…

बालेवाडी :

बालेवाडी परिसरामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, चैतन्यमय वातावरणामध्ये विविध मंडळांनी वेगवेगळे देखावे सादर केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने विविध मंदिराच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. तर काही मंडळी विद्युत रोषणाई व गणेश मंदिर भर दिला आहे.

बालेवाडी येथील लक्ष्मी माता मित्र मंडळाच्या वतीने राजस्थान येथील भव्य दिव्य जसवंत थाडा या मंदिराचे आकर्षण देखावा उभा करण्यात आला आहे. त्याचबरोबर दरवर्षी राबवण्यात येणारे रक्तदान शिबिर रविवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी घेण्यात येणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी नागरिकांनी सहभाग घ्यावा असे लक्ष्मी माता मंडळाचे वतीने आव्हान करण्यात आले आहे.

श्री अष्टविनायक मित्र मंडळ बालेवाडी यांचे रोप्यमहोत्सवी (२५ वे) वर्ष असून मंडळानी ह्यावर्षी श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. तसेच मंडळ दर वर्षी सामाजप्रभोदन व्याख्यान व आरोग्यविषयक उपक्रम राबवत असतात. रविवार दिनांक 24 सप्टेबंर 2023 रोजी श्री विदर्भ रत्न रामणाचार्य ह.भ.प.रामरावजी ढोक महाराज यांचे कीर्तन ठेवलेले आहे.

क्रांती मित्र मंडळ बालेवाडी गावठाण यांनी आकर्षक असा मेघडंबरी करून गणेशाची स्थापना त्यामध्ये केली आहे.

 

 

 

 

See also  योगीराज पतसंस्थेने गरीब मुलीला संपूर्ण उच्च शिक्षणासाठी घेतले दत्तक....